माजी नगरसेवकासह ४२ जुगाऱ्यांना अटक; ६० लाखाचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: May 27, 2017 13:26 IST2017-05-27T13:26:17+5:302017-05-27T13:26:17+5:30
शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसांनी छापा टाकून माजी नगरसेवकासह ४२ जुगाऱ्यांना अटक केली़

माजी नगरसेवकासह ४२ जुगाऱ्यांना अटक; ६० लाखाचा मुद्देमाल जप्त
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ २७ - नगर-कल्याण रोडवरील हॉटेल अमरज्योत येथे शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसांनी छापा टाकून माजी नगरसेवकासह ४२ जुगाऱ्यांना अटक केली़ ६ लाख रुपये रोख व सुमारे ५४ लाख रुपयांचे साहित्य असा सुमारे ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
नगर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ माजी नगरसेवक राजेंद्र रामनारायण राठोड, गणेश होळकर, संजय बुलाखे, राकेश आजबे, नरेश भूमकर, अशोक बेल्हेकर, संतोष साखला, अशोक लढ्ढा, गणेश चोभे, पोपट मोरे, सतीष होळकर, मनिकांत सिंग, मच्छिंद्र चोभे, चंद्रशेखर रोकडे, चंद्रशेखर लकडे, सचिन काळे, शिवाजी बेलेकर, सागर शिंदे, दिगंबर नवले, सुधीर राऊत, जितेंद्र राऊत, मुकेश शाहू, राकेश कश्यप, पवन राम, सुनील गोरे, जालिंदर नवले, कैलास लष्करे, मोहन कुंदाडे, संतोष कुमकर, वसंत वडे, गजानन काळे, संतोष भुषा, गोटीराम आजबे, भाऊसाहेब शिंदे, गणेश पालवे, पोपट घुले, अंगद पडोळे, संजय जेधे, नाना कुमकर, रामदेव शेंडे, जालिंदर आहेर आदी आरोपींची नावे आहेत़
सहायक पोलीस अधीक्षक डॉ़ अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र भालसिंग, गणेश चव्हाण, रंगनाथ नरसाळे, युवराज गिरवले, सचिन जाधव, प्रमोद जरे, संतोष ओव्हळ, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, मच्छिंद्र बर्डे, विनोद मासाळकर, देविदास काळे यांनी ही कारवाई केली़ नगर तालुका पोलीस ठाण्यात गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे़