४१ लाखांचे अवैध रेशनचे धान्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:02+5:302021-06-20T04:16:02+5:30

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर, अन्न धान्य पुरवठा निरीक्षक अधिकारी निशा पाईकराव, कार्यालय अधीक्षक संतोष लोटके, गुन्हे ...

41 lakh illegal ration grains seized | ४१ लाखांचे अवैध रेशनचे धान्य जप्त

४१ लाखांचे अवैध रेशनचे धान्य जप्त

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर, अन्न धान्य पुरवठा निरीक्षक अधिकारी निशा पाईकराव, कार्यालय अधीक्षक संतोष लोटके, गुन्हे शोथ पथकाचे मनोज कचरे, गणेश धोत्रे, विष्णू भागवत, नितीन शिंदे, शाहिद शेख, नितीन गाडगे, सुमित गवळी, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत यांनी ही कारवाई केली. शासकीय धान्य योजनेचा गहू व तांदळाचा अवैधरीत्या साठा करून तो मिलमध्ये पीठ करण्याकरिता पाठविला जातो, अशी माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी १९ जूनला पोलिसांनी मार्केट यार्ड भागातील सोहम ट्रेडिंग कंपनीत (गाळा नं. ५९), तसेच केडगाव इंडस्ट्रीयल भागात नर्मदा फ्लोर मील व त्याच्या मागील गोदाम या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पुरवठा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. छापा टाकून पोलिसांनी ४० लाख ९९ हजार ३७५ किमतीचा अवैधरीत्या साठवून ठेवलेला मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी केडगावमधून गणेश श्रीनिवास छंवर, जालिंदर नवनाथ चितळे, जालिंदर सुभाष जगताप, संदीप कारभारी पागिरे यांना, तर मार्केट येथून सुरेश बबनराव रासकर, सागर अशोक नांगरे, आदिनाथ सुखदेव चव्हाण, भगवान हरिभाऊ छत्तीशे यांना ताब्यात घेतले.

Web Title: 41 lakh illegal ration grains seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.