संगमनेरमध्ये आढळले ३६ नवे रुग्ण, यासह जिल्ह्यात ६४ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 13:41 IST2020-07-26T13:40:37+5:302020-07-26T13:41:01+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात आज सकाळी कोरोनाच्या ६४ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये सर्वाधिक३६ रुग्ण संगमनेर तालुक्यात आढळून आले आहेत.

संगमनेरमध्ये आढळले ३६ नवे रुग्ण, यासह जिल्ह्यात ६४ रुग्णांची भर
अहमदनगर : जिल्ह्यात आज सकाळी कोरोनाच्या ६४ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये सर्वाधिक३६ रुग्ण संगमनेर तालुक्यात आढळून आले आहेत.
रविवारी दुपारी आढळून आलेल्या ६४ रुग्णांमध्ये संगमनेर तालुक्यात ३६, कर्जत तालुक्यात १०, राहाता तालुक्यात १२, राहुरी तालुक्यात ४ रुग्णांचा समावेश आहे.
संगमनेर तालुक्यात पद्मानगर, बाजारपेठ, जनता नगर, संगमनेर, विद्यानगर, बडोदा बँक, राजापूर, कोंची, शिबलापूर, गणेशनगर, कुरण, मुटकुळे हॉस्पिटल, खंडोबा गल्ली, गुंजाळवाडी, जवळे कडलग येथे रुग्ण आढळून आले आहेत.
राहाता तालुक्यात राशिन, मिरजगाव, कर्जत, पिंपळवाडी येथे रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यात शिर्डी, नांदुरखी, गोगलगाव येथे रुग्ण आढळून आले आहेत. राहुरी तालुक्यात येवले आखाडा, वांबोरी आणि कात्रड येथे रुग्ण आढळून आले आहेत.