शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

अहिल्यानगरमध्ये विधानसभा निवडणूक मतदानावेळी गैरप्रकार रोखण्यासाठी ३६ ड्रोन ठेवणार नजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:23 IST

पारदर्शक, शांततेत निवडणूक पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज.

Ahilyanagar Vidhan Sabha Election ( Marathi News ) : निवडणुकीतील जाहीर प्रचार संपल्यानंतर पुढील ७२ तासांत अनेक घडामोडी घडतात. गुप्त प्रचाराच्या नावाखाली राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु गत लोकसभा निवडणुकीचा अनुभव विचारात घेऊन जिल्हा निवडणूक शाखा आणि पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर राहणार असून, जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मागील पंधरा दिवस उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोप करत जोरदार प्रचार केला जात होता. सोमवारी सायंकाळी ६ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक शाखेचे कर्मचारी आज मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. 

जिल्ह्यातील १२ मतदारसंघात ३ हजार ७६५ मतदान केंद्रांवर बुधवारी मतदान होणार असून, ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १९ लाख ४६ हजार ९४४ पुरुष, १८ लाख ३६ हजार ८४१ महिला, तर २०२ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारांना आपले मतदानाचे केंद्र, यादीतील क्रमांक, आदींची माहिती असलेल्या ९९.३७ टक्के मतदार चिठ्ठयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच मतदारांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये स्त्री-पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, रांगेत गर्दी झाल्यास बसण्यासाठी बेंचेस, खुर्चा, प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, १६९ मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा, वयोवृद्ध नागरिक आणि दिव्यांगासाठी व्हीलचेअर आदी सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

३६ ड्रोन तैनात असणार जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले की, पुढील दोन दिवसांत कोणत्याही प्रकारच्या अवैध प्रकार होत असल्याचे आढळून आल्यास मतदारांना सी-व्हिजिल अॅपवर तक्रार नोंदवता येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटप, गर्दी किंवा संशयास्पद हालचालींवर टिपण्यासाठी दोन ते तीन ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. १२ विधानसभा मतदारसंघात ३६ ड्रोन तैनात असणार आहेत.

५० टक्के केंद्रावर वेब कास्टिंग जिल्ह्यातील ३ हजार ७६५ मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंग केली जाणार आहे. अहमदनगर शहर मतदारसंघात सर्वच २९७ केंद्र तर इतर ११ मतदारसंघांतील निम्या मतदान केंद्रावर वेब कास्टिंग असणार आहे.

१७ हजार १६९ टपाली मतदान जिल्ह्यात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ व ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या २ हजार ५१३ मतदारांना गृहमतदान, तर १४ हजार २७८ मतदान निवडणूक कर्तव्यार्थ असणारे कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील ५६ कर्मचारी आणि ३२२ सैनिक मतदार अशा प्रकारे १७ हजार १६९ मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला.

२१ हजार ५७४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्ह्यातील १२ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी २१ हजार ५७४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये ३८८ सेक्टर ऑफिसर, २१० सूक्ष्म निरीक्षक, ४ हजार १६८ केंद्राध्यक्ष, ४ हजार १६८ प्रथम मतदान अधिकारी, ८ हजार ४७२ इतर मतदान अधिकारी, तर ४ हजार १६८ शिपाई यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ahilyanagarअहिल्यानगर