३५५ गावे टंचाईग्रस्त
By Admin | Updated: July 11, 2014 00:56 IST2014-07-11T00:38:11+5:302014-07-11T00:56:50+5:30
अहमदनगर: सन २०१३-१४ मधील रब्बी हंगामातील पैसेवारी ५० पेक्षा कमी असणारी जिल्ह्यातील ३५५ गावे टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत़

३५५ गावे टंचाईग्रस्त
अहमदनगर: सन २०१३-१४ मधील रब्बी हंगामातील पैसेवारी ५० पेक्षा कमी असणारी जिल्ह्यातील ३५५ गावे टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत़ टंचाईग्रस्त घोषित गावातील खातेदारांना विविध सवलती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली़
रब्बी हंगामात अत्यल्प पाऊस पडला आहे़ कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यातील सात तालुक्यातील गावांचे जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले़ प्रत्येक गावातील माहिती घेऊन टंचाईग्रस्त गावांचा अहवाल तयार करण्यात आला आहे़ जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सात तालुक्यातील ३५५ गावांची पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी निघाली आहे़ त्यामुळे ही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत़ टंचाईग्रस्त गावांसाठी शासनाने विशेष सवलती जाहीर केल्या आहेत़या सवलतीस टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थ पात्र ठरतील़ टंचाईग्रस्त गावात नगर तालुक्यातील सर्वाधिक ९५ गावांचा समावेश आहे़
जून महिना कोरडा गेला़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे़ वेळेत पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत़ त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत़ रब्बी हंगामात पाऊस न पडलेल्या गावांत भीषण टंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे वरील घोषणा करण्यात आली असून, घोषित गावातील खातेदारांना महसुलात सूट दिली जाईल़ सहकारी कर्जाचे रुपांतर करून कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल़ टंचाईग्रस्त म्हणून घोषित केलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज खंडित न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत़ जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळणार आहे़ (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांची दांडी
पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी बैठकीचे नियोजन केले होते़ पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने सर्व विभागाचे प्रमुख फायलींचे गठ्ठे घेऊन हजर होते़ परंतु पालकमंत्री आलेच नाहीत़
तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावे
कोपरगाव-६३
श्रीरामपूर-५६
राहाता-३६
राहुरी-९
नेवासा-३९
नगर-९५
पाथर्डी-५७
काय आहे सवलत
जमीन महसुलात सूट
सहकारी कर्जाचे रुपांतर
परीक्षा शुल्कात माफी
रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता
शेती पंपाची वीज खंडित
न करणे