बेलापूरमध्ये बसणार ३५ सीसीटीव्ही कॅमेरे
By Admin | Updated: August 17, 2016 00:44 IST2016-08-17T00:32:27+5:302016-08-17T00:44:52+5:30
बेलापूर : गाव आणि परिसरातील सर्व प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामसुरक्षेसाठी येथील व्यापारी,

बेलापूरमध्ये बसणार ३५ सीसीटीव्ही कॅमेरे
सुरुवात चंद्रपुरातूनच : जिल्हा पोलीस विभागाचे कौतुक
चंद्रपूर : गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि राज्याचे वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोन वजनदार मंत्र्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी चंद्रपुरातील जिल्हा सायबर लॅबचे उद्घाटन पार पडले. विशेष म्हणजे, राज्यात निर्माण झालेल्या सायबर लॅबचे उद्गाते चंद्रपूर जिल्हा पोलीस विभाग ठरले. यामुळे दोन्ही मंत्र्यांनी पोलीस विभागाचे तोंडभरुन कौतुक केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात हा उद्घाटन सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी ना. हंसराज अहीर होते तर ना.सुधीर मुनगंटीवार यांनी फित कापून उद्घाटन केले. यावेळी आ. नाना श्यामकुळे, जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंग आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार यांनी भाषणातून जिल्हा पोलीस विभागाचे कौतुक केले. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक उपक्रमांचे कौतुक केले. राज्यातील शेषन व जेएमएफसी गुन्ह्यांचे प्रमाण ३० टक्क्यांवर असल्याने पोलीस व न्यायीक प्रक्रियेवर समाजाचा विश्वास वाढत चालल्याचे ते म्हणाले.
ना. हंसराज अहीर यांनी ‘से नो टू’ या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. हा उपक्रम व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री या नात्याने पोलिसांच्या प्रत्येक मोहीमेला सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रारंभी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी प्रास्ताविकातून सायबर लॅबविषयी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती दिली.
गुन्हे नियंत्रणावर असलेली आगेकूच आलेखाच्या माध्यमातून मांडली. प्रतिसाद अॅप, पोलीस मित्र मोहीमेचे यश, मेळाव्यातून मिळणारा प्रतिसाद त्यांनी प्रतिपादित केला.
कार्यक्रमाचे संचालन सायबर लॅब प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विकास मुंढे यांनी तर आभार अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपुत यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने हजर होते. (जिल्हा प्रतिनिधी)