राज्यात ३३ ग्रामसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:54+5:302021-04-30T04:25:54+5:30
याबाबत युनियनने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षीही काही ग्रामसेवकांचा कर्तव्य बजावताना कोविड संसर्ग ...

राज्यात ३३ ग्रामसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू
याबाबत युनियनने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षीही काही ग्रामसेवकांचा कर्तव्य बजावताना कोविड संसर्ग होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यापैकी सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीतील काहींचे विमा कवच प्रस्ताव प्रलंबित आहेत. याशिवाय चालू वर्षीही ग्रामसेवक अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. काम करताना त्यांना संसर्ग होत आहे. जानेवारी ते २५ एप्रिल २०२१ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील ३३ ग्रामसेवकांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांचे प्रत्येकी ५० लाख विमा कवचाचे प्रस्ताव तत्काळ मंजूर करावेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन मयत ग्रामसेवकांच्या कुटुंबातील पात्र वारसास विशेष बाब म्हणून जिल्हा परिषद सेवेत नोकरी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.