आंबी खालसा येथे ३० बेडचे विलगीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:18 IST2021-04-26T04:18:09+5:302021-04-26T04:18:09+5:30
रुग्णांना स्थानिक पातळीवरच उपचार मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. हे संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू व्हावे, यासाठी महसूलमंत्री ...

आंबी खालसा येथे ३० बेडचे विलगीकरण केंद्र सुरू
रुग्णांना स्थानिक पातळीवरच उपचार मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हे संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू व्हावे, यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हा परिषद काँग्रेस गटनेते अजय फटांगरे यांच्या माध्यमातूम सरपंच बाळासाहेब ढोले यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. या सेंटरमध्ये सध्या ९ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहे. संगमनेर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढते आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची बेड मिळविण्यासाठी कसरत होते आहे. आंबी खालसा गावासह परिसरातील गावांमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने आंबी खालसा येथे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.
जिल्हा परिषद काँग्रेस गटनेते अजय फटांगरे यांनी तत्काळ पाठपुरावा करून हे कोविड सेंटर प्रभाकर भोर विद्यालय येथे सुरू झाले आहे. शुक्रवारी या कोविड सेंटरला अजय फटांगरे यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.
यावेळी सरपंच बाळासाहेब ढोले, उपसरपंच रशीद सय्यद, डॉ.राहुल आहेर, डॉ.अमोल ढमढेरे, डॉ.अश्विनी गाडेकर, गोकुळ कहाणे, सुरेश गाडेकर, संतोष घाटकर, दीपक ढमढेरे, अशोक गाडेकर, सागर कान्होरे उपस्थित होते.