नगर जिल्ह्यातील २७९ कोरोना रुग्णांना मिळाला डिस्चार्ज; आज २४ नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 13:33 IST2020-08-01T13:33:19+5:302020-08-01T13:33:51+5:30
अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी (३१ आॅगस्ट) सायंकाळी ते शनिवारी दुपारी बारावाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत २४ ने वाढ झाली आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

नगर जिल्ह्यातील २७९ कोरोना रुग्णांना मिळाला डिस्चार्ज; आज २४ नव्या रुग्णांची भर
अहमदनगर : जिल्ह्यात शुक्रवारी (३१ आॅगस्ट) सायंकाळी ते शनिवारी दुपारी बारावाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत २४ ने वाढ झाली आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ६३९ इतकी झाली आहे.
कोरोनाबाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ९, (सिव्हिल हडको १, निर्मल नगर १, माळीवाडा १, पाईप लाईनरोड १, गुलमोहररोड १, कायनेटिक चौक १, कासारवाडी पंपिग स्टेशन १, नगर शहर १, शिवाजीनगर कल्याण रोड १), नेवासा १३ (तरवडी १, कुकाणा १, जैनपूर ३, पाचेगाव १, नेवासा फाटा २, सोनई १), जामखेड २ ( शहर १, डोणगाव १). अशा २४ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, शनिवारी २७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा ११७, संगमनेर ३८, राहाता १८, पाथर्डी १४, नगर ग्रामीण २१, श्रीरामपूर ५, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा १, श्रीगोंदा १, पारनेर १०, अकोले १२, राहुरी ७, शेवगाव ४, कोपरगाव ५, कर्जत ३ अशा रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांनी दिली.