शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

नगर जिल्ह्यात गुरुवारी २७८ कोरोना पॉझिटिव्ह, नगर शहरात ७४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 18:58 IST

अहमदनगर : बुधवारी सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००६ इतकी झाली आहे.

अहमदनगर: जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार १११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ११७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १२७ आणि अँटीजेन चाचणीत ३४ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३५, अकोले ०६, जामखेड ०६, कर्जत ०५, नगर ग्रामीण ०९, पारनेर ०८, पाथर्डी ०२, राहाता १४, संगमनेर २०, श्रीरामपूर १०, मिलिटरी हॉस्पिटल ०१, इतर जिल्हा०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३४, अकोले ०२, कर्जत ०३, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०५, पारनेर ११, पाथर्डी ०२, राहता १४, राहुरी ०१, संगमनेर ३३, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०४ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३४ जण बाधित आढळुन आले. मनपा ०५, जामखेड १३, कर्जत ०३, नगर ग्रामीण ०२,पारनेर ०४, पाथर्डी ०१, राहाता ०३, राहुरी ०२, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३४, कर्जत ०१, कोपरगाव ११, नगर ग्रामीण १८, पारनेर ११, पाथर्डी ०३, राहाता २४, राहुरी ०६, संगमनेर २१, शेवगाव १०, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

--------------

बरे झालेली रुग्ण संख्या : ७३१११

उपचार सुरू असलेले रूग्ण : १००६

मृत्यू : ११३४

एकूण रूग्ण संख्या : ७५२५१

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या