आठ डेपोमधून २७१० ब्रास वाळू जप्त

By Admin | Updated: July 10, 2014 00:31 IST2014-07-09T23:28:31+5:302014-07-10T00:31:43+5:30

जामखेड : खर्डा येथील खैरी मध्यम प्रकल्प व खैरी नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा होत असून त्याचे आठ ठिकाणी वाळू डेपो आढळून आले. नायब तहसीलदार शिल्पा पाटील व पथकाने या डेपोचे पंचनामे करुन

2710 brass sand seized in eight depots | आठ डेपोमधून २७१० ब्रास वाळू जप्त

आठ डेपोमधून २७१० ब्रास वाळू जप्त

जामखेड : खर्डा येथील खैरी मध्यम प्रकल्प व खैरी नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा होत असून त्याचे आठ ठिकाणी वाळू डेपो आढळून आले. नायब तहसीलदार शिल्पा पाटील व पथकाने या डेपोचे पंचनामे करुन २ हजार ७१० ब्रास वाळू जप्त केली.
खैरी नदीपात्र व खैरी प्रकल्पातून वाळूचा बेकायदा उपसा गेल्या अनेक महिन्यापासून सुरु आहे. याबाबत महसूल प्रशासनाने काही जणांवर २३ फेब्रुवारी रोजी कारवाई करुन सुमारे आठ कोटीचा दंड केला होता. परंतु या वाळूचोरांनी दंडापोटी एक रुपयाही महसूल विभागाकडे भरला नाही. परंतु पुन्हा वाळू उपसा होत राहिला. याबाबत महसूल प्रशासन अनभिज्ञ होता. मात्र, १ जुलै रोजी महसूल खात्याला निनावी टपालातून अवैध वाळू उपसा होत असून वाड्या-वस्त्यावर वाळू साठ्याचे ढिगारे आहेत, असा मजकूर असलेले पत्र मिळाले. त्यानुसार नायब तहसीलदार शिल्पा पाटील, मंडल अधिकारी पी. ए. पाचारणे, ए. व्ही. बडे, तलाठी एस. एस. गायकवाड, टी. व्ही. बनसोडे, काळे आदींच्या पथकाने दोन दिवसापूर्वी पाहणी केली़ नदीपात्र व खैरी प्रकल्पात मोठमोठे खड्डे आढळून आले. तसेच जुनी वाकी, नवीन वाकी, महारनवरवस्ती या ठिकाणी मोठमोठे आठ वाळूचे ढिगारे आढळून आले व त्याचे पंचनामे केले. त्यामध्ये मारुती सुंदर सुळे ४१.३४ ब्रास, नितीन कांतीलाल जगताप ५०८.८३ ब्रास, विजय जगन्नाथ सावंत ७११.३० ब्रास, अशोक अर्जुन सोरटे ८९८.२३ ब्रास, शहाजी नामदेव सुरवसे ५८.३० ब्रास, दीपक अर्जुन सावंत २९९.६१ ब्रास (सर्व रा. वाकी) तर गणेश आजीनाथ लटके १९३.९३ ब्रास(रा. सातेफळ) अशी एकूण २ हजार ७१० ब्रास वाळू जप्त करण्यात आली़
तालुक्यात सात ते आठ वाळू साठे आहेत. त्याबाबत आॅनलाईन निविदा काढल्या होत्या. परंतु त्या ठिकाणची प्रत्यक्षात असलेली वाळू व लिलावाची असलेली बोली जास्त असल्याने कोणीच निविदा भरली नाही. त्या परिसरातील वाळू साठ्याचे मोजमाप घेऊन त्याची खात्री करावी, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
वाळू डेपोधारकांना दंडाची रक्कम निश्चित करुन नोटिसा पाठवल्या जाणार आहे. जर दंड भरला नाही तर संबंधितांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार आहे़
-शिल्पा पाटील,
नायब तहसीलदार

Web Title: 2710 brass sand seized in eight depots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.