२६ वर्षानी फरार आरोपी गजाआड
By Admin | Updated: April 20, 2015 13:14 IST2015-04-20T01:41:19+5:302015-04-20T13:14:10+5:30
कोपरगाव : सव्वीस वर्षापासून फरार असलेला खुनाच्या गुन्ातील आरोपीस रविवारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून पकडले़

२६ वर्षानी फरार आरोपी गजाआड
कोपरगाव : सव्वीस वर्षापासून फरार असलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस रविवारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून पकडले़
घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, १९८९ रोजी कारवाडी येथील सोमनाथ कारभारी मोहिते हा खुनाच्या गुन्ह्यात अटक होता. काही दिवसांनी तो पॅरोलवर सुटला़ परंतु नंतर हजर झालाच नाही. तेव्हापासून तो फरार होता़ रविवारी तो कारवाडी येथे आपल्या घरी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना मिळाली़ त्यांनी पोलीस उपनिरिक्षक सुधीर पाटील, अशोक कुसाळकर, सांगे, गाढे, कुदळे, मुंढे व केणे या पोलीस कर्मचार्यांचे पथक तयार केले़ या पथकाने सापळा रचून माहिते यास ताब्यात घेतले़ (प्रतिनिधी)