शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

२६ जनावरांना कत्तलखान्यात नेणारा ट्रक पकडला

By admin | Updated: May 7, 2017 14:53 IST

२६ जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी सोनेगाव येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी मदतीने पकडला़

आॅनलाइन लोकमतजामखेड (अहमदनगर), दि़ ७ - २६ जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी सोनेगाव येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी मदतीने पकडला़ ट्रकचालक फरार झाला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़नान्नज-सोनेगाव रोडवरील सोनेगाव येथील खैरी नदीच्या पुलावर रविवारी पहाटेच्या सुमारास एम़ एच़ २३, डब्ल्यू. १२१ या ट्रकमधून २६ जनावरे कत्तलखान्याकडे जात असल्याचे शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना समजले़ सोनेगाव येथील निलेश गायवळ मित्र मंडळाचे जानकीराम गायकवाड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ट्रक अडवून जनावरे कोठे घेऊन चालला आहे, असे चालकाला विचारले चालकाने तेथून पळ काढला़ त्याचवेळी जामखेड येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले, सचिन पवार, सुजित पवार, गणेश सुळ, योगेश सुरवसे, सुनील जगताप, नाना खंडागळे, संतोष निमोणकर, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे जामखेड पोलिसांसह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी तपासणी केली असता या ट्रकमध्ये १४ मोठे व लहान १२ असे एकूण २६ जणावरे आढळून आले. हा ट्रक जनावरांसह जामखेड पोलीस ठाण्यात आणून ट्रक चालकावर पोलीस कॉन्स्टेबल गणेश साने यांच्या फिर्यादीवरुन आरोपी ट्रक चालक जबीर (पुर्ण नाव माहीत नाही, रा़ मोमीनपुरा, बीड), ट्रक क्लिनर अब्दुल हमीद हबीब (वय ३५, रा. बार्शी नाका बीड) व मालक सत्तार कुरेशी, (रा.मोमिनपुरा, बीड) या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ हा ट्रक जनावरांना घेऊन कत्तलखान्यात चालला होता, असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले़ पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करत आहेत.