कोरोनाबाधितांच्या संख्येत २५२ जणांची भर
By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:45+5:302020-12-09T04:16:45+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत २५२ जणांची भर पडली, तर १७१ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सध्या ...

कोरोनाबाधितांच्या संख्येत २५२ जणांची भर
अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत २५२ जणांची भर पडली, तर १७१ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सध्या १५८९ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
आज १७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार ७३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत २५२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५८९ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ११०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३७ आणि अँटिजन चाचणीत १०५ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (६१), अकोले (१७), जामखेड (३), कर्जत (९), कोपरगाव (१९), नगर ग्रामीण (११), नेवासा (२१), पारनेर (१२), पाथर्डी (१८), राहुरी (६), संगमनेर (३४), शेवगाव (१२), श्रीगोंदा (४), श्रीरामपूर (८), मिलिटरी हॉस्पिटल (१), इतर जिल्हा (१), राहाता (१०) येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ६५ हजार २९३ इतकी झाली आहे, तर बरे झालेल्यांची संख्या ६२ हजार ७३६ इतकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९६८ जणांचा मृत्यू झाला आहे.