अविनाश आदिक यांच्या वाहनातून साडेचार लाख जप्त; नाशिकला भरारी पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 18:02 IST2019-09-28T18:01:51+5:302019-09-28T18:02:10+5:30
नाशिक रोड येथे भरारी पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या वाहनातून चार लाख ५८ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. ती रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे. सोमवारी या रकमेसंबंधात सर्व ते पुरावे दिल्यानंतर ती परत मिळेल, असे अविनाश आदिक यांनी स्पष्ट केले.

अविनाश आदिक यांच्या वाहनातून साडेचार लाख जप्त; नाशिकला भरारी पथकाची कारवाई
श्रीरामपूर : नाशिक रोड येथे भरारी पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या वाहनातून चार लाख ५८ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. ती रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे. सोमवारी या रकमेसंबंधात सर्व ते पुरावे दिल्यानंतर ती परत मिळेल, असे अविनाश आदिक यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असताना भरारी पथकाने शिंदे गावानजीक ही कारवाई केली. पथकात हरी सूर्यवंशी, संतोष पिंगळे, हवालदार शामराव शिंदे व सखाराम शेळके यांचा समावेश होता. पथकाचे प्रमुख मच्छिंद्र कांगणे यांनी ती कोषागार कार्यालयात जमा केली.
दरम्यान, आदिक हे मुंबई येथून श्रीरामपूरला येत असताना पथकाने त्यांचे वाहन अडविले. ५० हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम घेऊन जाता येत नाही असे पथकाने त्यांना सांगितले. या रकमेबाबतचा तपशील देऊन ती परत घेऊ. मात्र शनिवार व रविवारी सुटी असल्याने सोमवारी त्यावर कार्यवाही होईल, असे आदिक यांनी म्हटले आहे.