श्रीगोंद्यात आढळले २३९ क्षयरोगी, ९ कुष्ठरोगी
By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:45+5:302020-12-06T04:21:45+5:30
श्रीगोंदा : तालुक्यात आराेग्य विभागाने ‘होम टू होम’ सर्वेक्षणात २३९ क्षयरोग रुग्ण, तर ९ कुष्ठरोगाचे रुग्ण आढळले, अशी माहिती ...

श्रीगोंद्यात आढळले २३९ क्षयरोगी, ९ कुष्ठरोगी
श्रीगोंदा : तालुक्यात आराेग्य विभागाने ‘होम टू होम’ सर्वेक्षणात २३९ क्षयरोग रुग्ण, तर ९ कुष्ठरोगाचे रुग्ण आढळले, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.
१ डिसेंबरपासून सुरू केलेल्या सर्वेक्षण मोहिमेत १ लाख ४७८ नागरिकांची आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी तपासणी केली आहे. यामध्ये क्षयरोगाचे चार नवीन तर कुष्ठरोगाचा एक रुग्ण आढळून आला आहे. यापूर्वीच्या सर्वेक्षणात क्षयरोगाचे २३५ तर कुष्ठरोगाचे ८ रुग्ण होते. सर्वेशन पूर्ण झाल्यानंतर रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत क्षय व कुष्ठरोगींचा आकडा कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १९ कुष्ठरोगी, तर क्षयरोगाचे ३२१ रुग्ण होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कुष्ठ व क्षयरोगींची सरासरी आकडेवारी कमी होण्याची शक्यता आहे. यंदा कोरोनाच्या काळात आराेग्य विभागाने मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक जनजागृती केली होती. तसेच कोरोनामुळे नागरिक मास्क वापरत आहेत. यामुळे क्षयरोगाच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसला आहे. आरोग्य विभागाची पथके ३१ डिसेंबरअखेर घरोघर सर्व्हेक्षण करणार आहेत. पुढील पंधरवड्यात क्षय व कुष्ठरोगींमधील संशयित रुग्णांची तपासणी तज्ज्ञ डाॅक्टरांकडून करण्यात येणार आहे.
---
कुष्ठ व क्षयरोगाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींनी आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. तसेच वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे.
डॉ. नितीन खामकर,
तालुका वैद्यकीय अधिकारी, श्रीगोंदा.