२२४ चाकांचा ट्रेलर नादुरुस्त!
By Admin | Updated: June 22, 2014 00:22 IST2014-06-21T23:45:49+5:302014-06-22T00:22:10+5:30
राहुरी : मुंबईहून विजेचे सयंत्र घेऊन निघालेला तब्बल २२४ चाकांचा ट्रेलर शुक्रवारी नगर-मनमाड रस्त्यावर विळद घाटात बंद पडला.
२२४ चाकांचा ट्रेलर नादुरुस्त!
राहुरी : मुंबईहून विजेचे सयंत्र घेऊन निघालेला तब्बल २२४ चाकांचा ट्रेलर शुक्रवारी नगर-मनमाड रस्त्यावर विळद घाटात बंद पडला. आठवडाभरात त्याला सोलापूरला पोहोचायचे आहे. महाकाय हा ट्रेलर पाहण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांनी गर्दी केली होती.
एक महिन्यापूर्वी विजेचे सयंत्र घेऊन मुंबई येथून हा ट्रेलर निघाला आहे़ ट्रेलरला मागील व पुढील बाजूंनी दोन वाहने जोडण्यात आली आहेत़ दोन वाहनांच्या जोरावर हे महाकाय सयंत्र ओढले जात आहे.
ट्रेलरच्या मागील व पुढील बाजूला चाके बसविण्यात आले आहेत़ मध्यभागी एकही चाक नाही़ सयंत्राचा जास्त भार चाकावर पडत आहे़ (तालुका प्रतिनिधी)