२१० लाभार्थ्यांना मिळणार बालसंगोपन योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:18+5:302021-06-20T04:16:18+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील दोनशे दहा लाभार्थ्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळणार आहे. तसा आदेश निघाला असल्याचे पंचायत समिती उपसभापती ...

२१० लाभार्थ्यांना मिळणार बालसंगोपन योजनेचा लाभ
केडगाव : नगर तालुक्यातील दोनशे दहा लाभार्थ्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळणार आहे. तसा आदेश निघाला असल्याचे पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी सांगितले. याबाबतचे पत्र जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.जी. पाटील यांनी दिले आहे.
तालुक्यातील एक पालक, अनाथ मुलांनी बालसंगोपन योजनेचा लाभ मिळण्यासाठी जानेवारी २०२० पासून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केलेले आहेत. परंतु, अद्यापपर्यंत एकाही लाभार्थ्यास बालसंगोपन योजनेचा लाभ कार्यालयाकडून देण्यात आलेला नाही. कार्यालयाच्या अनास्थेमुळे तालुक्यातील अंदाजे दोनशे ते अडीचशे बालके लाभापासून वंचित आहेत. या योजनेचा लाभ मिळावा अन्यथा उपोषण केले जाईल, असा इशारा पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी दिला होता.
उपोषणासाठी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, संदीप गुंड, डॉ. दिलीप पवार, नगरसेवक योगीराज गाडे गेले असता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. जी. पाटील व संध्या राशीनकर यांनी या लाभार्थाना या योजनेचा लाभ देण्याचा आदेश पारित झाला आहे. शासनाकडून अनुदान उपलब्ध होताच खात्यावर जमा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.
---
तालुक्यातील बालकांची संख्या...
बालसंगोपन योजनेतंर्गत नगर तालुक्यातील दाखल आदेश दिलेल्या बालकांची गावनिहाय संख्या : नगर शहर (९९), रांजणगाव खुर्द, जेऊर, अकोळनेर, आठवड, देवगाव, निमगाव घाणा, चास, राळेगण म्हसोबा, सारोळा कासार, अरणगाव, पिंपळगाव माळवी प्रत्येकी (२), भिंगार (४), निंबोडी, मेहकरी, शेंडी, पिंपळगाव वाघा, माळवाडी तांदळी, मठ पिंपरी प्रत्येकी (१), निंबळक (१३), वडगाव गुप्ता (९), नवनागापूर (१८), रूईछत्तीसी (४), चिंचोडी पाटील (१५), बोल्हेगाव (१२), शिगवे नाईक (३), विळद (५).