२१ लाखांची फसवणूक : ओडिशामधील एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:15 IST2018-10-11T12:15:14+5:302018-10-11T12:15:17+5:30

श्रीगोंदा येथील कांदा व्यापारी सतीश पोखर्णा यांना कांद्याच्या व्यापारात सुमारे २१ लाखास गंडा घातल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी धनेश्वर बेहरा याला ओडिशा राज्यात जाऊन बेड्या ठोकल्या.

21 lakh fraud: One arrested in Odisha | २१ लाखांची फसवणूक : ओडिशामधील एकास अटक

२१ लाखांची फसवणूक : ओडिशामधील एकास अटक

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील कांदा व्यापारी सतीश पोखर्णा यांना कांद्याच्या व्यापारात सुमारे २१ लाखास गंडा घातल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी धनेश्वर बेहरा याला ओडिशा राज्यात जाऊन बेड्या ठोकल्या. मात्र मुन्ना बेहरा व प्रमोद बेहरा हे फरार झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, सतिश पोखर्णा यांनी या धनेश्वर मुन्ना प्रमोद कुमार (रा. बालीचंद्रपुर, जि. जाजपूर ओडिशा) यांनी २०१७ मध्ये सुमारे २७ लाखाचा कांदा खरेदी केला. त्यापैकी सहा लाख रोख दिले. बाकी २१ लाखाला गंडा घातला. पोखर्णा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पाटील, पोलिस कॉस्टेबल किरण बोराडे, रमाकांत परिट यांनी ओडिशा पोलिसांच्या मदतीने धनेश्वर बेहरा याला अटक केली.

Web Title: 21 lakh fraud: One arrested in Odisha