शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ ला राज्यात अन् देशात मोठा बदल दिसेल; बाळासाहेब थोरातांचे भाकीत

By शेखर पानसरे | Updated: March 4, 2023 15:24 IST

बाळासाहेब थोरात : संगमनेरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन, सरकारवर जोरदार टीका

शेखर पानसरे

संगमनेर : सरकारमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी कोण?, असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. परिणामतः ही अवस्था आहे. शेतकऱ्यांचे दुखं जाणून घ्यायला सरकार तयार नाही. त्यांच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच, जाहिरात बाजीवर कुणीही गतिमान होत नसतं. २०२४ ला राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात खूप मोठे बदल झालेले दिसतील, असे भाकीतही थोरात यांनी संगमनेर येथील आंदोलनादरम्यान केले.      महावितरण कंपनीकडून वीजबिल वसुलीच्या नावाखाली कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो आहे. कांद्याला भाव मिळत नाही. महागाई वाढली आहे. शनिवारी (दि. ४) काँग्रेसच्यावतीने संगमनेर बसस्थानकाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आमदार थोरात यांनी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, निर्मला गुंजाळ, सोमेश्वर दिवटे, नवनाथ अरगडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, संगमनेर तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, निखिल पापडेजा, सादिक तांबोळी आदी यावेळी उपस्थित होते.     एका बाजूला शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळालेच नाही तर त्यांना त्यांचा संसार चालविणे कठीण होते. अशा परिस्थितीत विजेचे बिल ते कुठून भरतील. हेच सरकारमध्ये असणारी नेतेमंडळी, पदाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणायचे की, ज्या पद्धतीने मध्यप्रदेशमध्ये वीजबिल माफ केले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही वीजबिल माफ करावे. आता त्यांनी वीजबिल माफ करावे. कारण या त्यांच्याच घोषणा होत्या. अशी टीका आमदार थोरात यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातFarmerशेतकरी