एस.टी.-लक्झरीच्या धडकेत २० जखमी

By Admin | Updated: June 5, 2014 00:08 IST2014-06-04T23:21:44+5:302014-06-05T00:08:15+5:30

अहमदनगर : पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर बुधवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास एस.टी. बस आणि लक्झरी बस यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत

20 injured in SU-luxury luxury | एस.टी.-लक्झरीच्या धडकेत २० जखमी

एस.टी.-लक्झरीच्या धडकेत २० जखमी

अहमदनगर : पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर बुधवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास एस.टी. बस आणि लक्झरी बस यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत २० प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रवासी किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडून दिले. कोपरगाव आगाराची एस.टी. बस ( क्रमांक एम.एच.२०- बी.एल.२२७४) नगरहून पुण्याकडे निघाली होती. या बसची नगरहून पुण्याकडे निघालेल्या लक्झरी बसला (एम.एच. १९, वाय ७०७७) समोरून धडक बसली. एस.टी. बस एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना एस.टी. बस समोरून येणार्‍या लक्झरीवर आदळली. त्यामुळे अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. लक्झरी बसचे चालक सुधाकर कोळी (रा. कसबा, जळगाव)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एस.टी. बसचे चालक भाऊसाहेब विटकर (रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भरत जाधव या घटनेचा तपास करीत आहेत.एस.टी. महामडंळाचे आगारप्रमुख प्रमोद नेहुल यांनी जखमी प्रवाशांना प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत देऊन त्यांना त्यांच्या गावी पोहोचण्यासाठी व्यवस्था केली.अपघातातील जखमी अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांची नावे अशी: वैभव विष्णू राजदीप (वय ३०, रा. कोल्हापूर),ज्ञानेश्वर विठ्ठल पाटील (वय ४४, रा. रावेर, जि. जळगाव),शिवाजी वासुदेव जाधववर ( वय २६, रा. सावरगाव, ता. गेवराई, जि. बीड), धम्मपाल अमृतराव झालटे (वय ४०, रा. खडकी,जि. पुणे), नारायण भगवान माळी (वय ४८, रा. धरणगाव, जि. जळगाव), दगडू गेनबा सोनवणे (वय ३४, रा. चोपडा), अनिल मुकुंदा धनगर (वय ३६, रा. शिरसोली, जळगाव), गजानन संजीवन पाटील ( वय २९, रा. चोपडा), सलीमा सत्तार अत्तार (वय ६०, रा. श्रीरामपूर), सय्यद सत्तार अत्तार ( वय ६०, रा. श्रीरामपूर), मेहमुद बाबा अत्तार (वय ५०, रा. नाशिक), मोहमद काफिल तांबोळी ( वय १८, रा.उत्तरप्रदेश) अशी जखमींची नावे आहेत.

Web Title: 20 injured in SU-luxury luxury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.