वृद्धेश्वर कारखाना परिसरात १९५ मिलीमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:21+5:302021-09-02T04:46:21+5:30
शिरापूर येथे खारुळ ओढ्यातील बंधारा फुटल्याने बाबासाहेब बुधवंत यांच्या शेतातील उडीद, तूर, कडवळ पीक पूर्णपणे वाहून गेले. सुसरे, प्रभूपिंपरी ...

वृद्धेश्वर कारखाना परिसरात १९५ मिलीमीटर पाऊस
शिरापूर येथे खारुळ ओढ्यातील बंधारा फुटल्याने बाबासाहेब बुधवंत यांच्या शेतातील उडीद, तूर, कडवळ पीक पूर्णपणे वाहून गेले. सुसरे, प्रभूपिंपरी रस्त्यावर पागोरी पिंपळगावच्या नंदिनी नदीवरील पुलाचा भराव वाहून गेला. त्यामुळे चार गावांचा संपर्क तुटला. हात्राळ, ढवळेवाडी, निवडुंगे, खोजेवाडी, फुलोरबाग परिसरात पावसाचा सर्वाधिक जोर होता. जांभूळ ओढ्याचे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने सात तास तिसगाव-शेवगाव-पैठण राज्यमार्ग बंद होता. गेल्या दशकात सलग पाऊस, पुराचा हा विक्रम असल्याचे सांगितले जाते. वृद्धेश्वर कारखाना येथील पर्जन्यमापकावर सुमारे १९५ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. मायंबा धबधबाही प्रवाही झाला आहे. नदीपात्रातील अतिक्रमणामुळे कासार पिंपळगाव, श्रीक्षेत्र हनुमान येथे गावकुसाला पुराचा प्रवाह भिडला. शेतवस्त्यात पाणी शिरले. गुरांचे गोठे पाण्याखाली गेले. तिसगाव येथे हयात पठाण यांची शेतजमीन वाहून विहीर बुजल्या गेली.