कोपरगाव : शहरासह तालुक्यात शनिवारी ( दि. १७ ) १८२ बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्याचा आकडा १,२०७ वर गेला आहे. शनिवारी रेपिड अँटिजन किटद्वारे ३६९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ११३ व्यक्ती बाधित आढळल्या, तसेच खासगी लॅब अहवालात ४८, नगर येथील अहवालात २१ असे एकूण तब्बल १८२ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत, तसेच ११५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले, तसेच ४४९ व्यक्तीच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. शहरातील ४५ वर्षीय पुरुष, तालुक्यातील हंडेवाडी येथील ५० वर्षीय पुरुष, तर सोनेवाडी येथील ६० वर्षीय पुरुष असा तिघांचा मृत्यू झाला, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
कोपरगावात शनिवारी आढळले १८२ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:21 IST