जिल्ह्यात आज १८ नवे कोरोनाबाधित रुग्ण; नगर शहरातील ६ तर भिंगारमधील ७ रुग्णांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 16:29 IST2020-07-10T16:28:28+5:302020-07-10T16:29:06+5:30
अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये शुक्रवारी (१० जुलै) दुपारी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आज १८ नवे कोरोनाबाधित रुग्ण; नगर शहरातील ६ तर भिंगारमधील ७ रुग्णांचा समावेश
अहमदनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये शुक्रवारी (१० जुलै) दुपारी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
यामध्ये नगर महापालिका क्षेत्रातील ६, भिंगार ७, संगमनेर १, शेवगाव १, पारनेर २ आणि राहाता येथील १ रुग्ण बाधित आढळून आले.
नगर महापालिका क्षेत्रात पद्मानगर येथे ३,, टिव्ही सेंटर १, फकिरवाडा १, पाईपलाइन रोड १ रुग्ण आढळून आला.
भिंगारमधील गवळीवाडा येथे ७ रुग्ण आढळून आले. संगमनेर तालुक्यात संगमनेर खुर्द येथे एक रुग्ण आढळून आला.
पारनेर तालुक्यातील पारनेर शहर आणि भाळवणी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तर शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर येथे तर राहाता तालुक्यात पाथरे येथे बाधित रुग्ण आढळला आहे.