कोपरगावात आज नवे १८ कोरोनाबाधीत रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 17:01 IST2020-08-30T17:00:05+5:302020-08-30T17:01:10+5:30
कोपरगावात रविवारी (३० आॅगस्ट) रॅपिड अँटिजेन किटद्वारे ७३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १८ जणांचे अहवाल बाधित तर ५५ निगेटिव्ह आले आहेत.

कोपरगावात आज नवे १८ कोरोनाबाधीत रुग्ण
कोपरगाव : कोपरगावात रविवारी (३० आॅगस्ट) रॅपिड अँटिजेन किटद्वारे ७३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १८ जणांचे अहवाल बाधित तर ५५ निगेटिव्ह आले आहेत.
६३ व्यक्तींचे स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.तर रविवारी २५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील बधितांचा आकडा ८४३ वर पोहोचला आहे. रविवारी आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णात कोपरगाव शहरातील बसस्थानक समोर १, टिळकनगर १, निवारा १, नवलेवस्ती कोपरगाव १, इंदिरापथ ५, गांधीनगर १, पांडेगल्ली १, सुभाषनगर ३, तालुक्यातील धारणगाव १, पढेगाव १, टाकळी १, मुर्षदपूर १ असे एकूण १८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. ३० आॅगस्ट अखेर ८४३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १४९ बाधीत व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहे.
उर्वरित ६७८ बाधीत व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील ४ हजार ७९ व्यक्तींची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ८०५ व्यक्तीची नगर येथे तर ३ हजार २७४ व्यक्तींची रॅपिड अँटिजेन किटद्वारे तपासणी केली आहे.