१७ महाराष्ट्र बटालियनच्या छात्रांकडून विजय दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:46 IST2020-12-17T04:46:14+5:302020-12-17T04:46:14+5:30
पाकिस्तानबरोबर झालेल्या १९७१ च्या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी केलेली उत्तम कामगिरी व पाकिस्तानने ९३ हजार सैनिकांना घेऊन पत्करलेली शरणागती या ...

१७ महाराष्ट्र बटालियनच्या छात्रांकडून विजय दिवस साजरा
पाकिस्तानबरोबर झालेल्या १९७१ च्या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी केलेली उत्तम कामगिरी व पाकिस्तानने ९३ हजार सैनिकांना घेऊन पत्करलेली शरणागती या दिवसाचे स्मरण छात्रांना व्हावे म्हणून व १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात पराक्रमाची गाथा रचत पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या सर्व वीर जवानांना सलाम व शहीद जवानांचे स्मरण होण्याच्या दृष्टिकोनातून मेजर संजय चौधरी यांनी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधून भारताने केलेल्या युद्धविषयक कामगिरीची माहिती विद्यार्थी व छात्रांना दिली.
स्वातंत्र्यानंतर भारतीय सैनिकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे स्मरण प्रत्येक भारतीयाने ठेवायला हवे. मातृभूमीसाठी लढताना शहीद झालेल्या शहिदांचे स्मरण सदोदित ठेवावे, असे मत मेजर संजय चौधरी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाबद्दल कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली, चीफ ऑफिसर भरत भालसिंग, चीफ ऑफिसर भाऊसाहेब शिंदे, गणेश भापकर, लेफ्टनंट माधव जाधव, कॅप्टन सुरेश जाधव, कॅप्टन गौतम खेडकर, लेफ्टनंट भरत डगडे, लेफ्टनंट आगळे, लेफ्टनंट प्राजक्ता भंडारी, डॉ. अजयकुमार पालवे, दिलीप करपे, अरविंद आचारी, सुभेदार साचिंदर सिंग, लेफ्टनंट सुनील फुलसुंगे, अमोल दहातोंडे, चोरमुले, गोरे, होळकर, धोतरे, रवींद्र चोबे, सुभेदार मेजर लेफ्टनंट पी. व्यंकटेश, गणेश वामन, रमेश गांगर्डे, शंकर मैना, सुखदेव गांगर्डे, प्रतीक शिंदे, विष्णू शिंदे, सोनार आदी मान्यवरांनी छात्रसैनिकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.
------
फोटो- १६ विजय दिवस