संजीवनी पाॅलिटेक्निकच्या १७ विध्यार्थ्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:29+5:302021-06-09T04:26:29+5:30

अमित कोल्हे : कोरोना संकटात महाविद्यालयाची भरारी कोपरगाव : संजीवनी के. बी. पी. पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ...

17 students of Sanjeevani Polytechnic | संजीवनी पाॅलिटेक्निकच्या १७ विध्यार्थ्यांची

संजीवनी पाॅलिटेक्निकच्या १७ विध्यार्थ्यांची

अमित कोल्हे : कोरोना संकटात महाविद्यालयाची भरारी

कोपरगाव : संजीवनी के. बी. पी. पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नांमुळे शारदा मोटर्स इंडस्ट्रिज या कंपनीने १७ विध्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक अमित कोल्हे यांनी दिली.

बीएस ६ (भारत स्टेज सिक्स) मानकांप्रमाणे दुचाकी व चार चाकी वाहनांच्या वायू उत्सर्जन यंत्रणेसाठी व इतरही यंत्रणेसाठी सुटे भाग बनविणाऱ्या चाकण येथील शारदा मोटर्स इंडस्ट्रिज कंपनीने संजीवनीच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्यांसाठी प्राधान्य दिले आहे. या कंपनीत निवड झालेल्या विध्यार्थ्यांमध्ये चंद्रकांत खेडकर, किशोर गोरडे, तोहिद शेख, सिध्दार्थ सांगळे, आतिश उगले, अक्षय आंधळे, यश गवसणे, संगीता पगारे, दीपाली पगारे, कोमल वाघमारे, अरूणा कोळसे, आदित्य अकोलकर, साक्षी कांबळे, नेहा अष्ठेकर, मेहराज शेख, अनुराग डोळसे व श्रेया कृष्णा कोळगे यांचा समावेश आहे.

सध्याच्या परिस्थितीत अनेक तांत्रिक हातांना काम नाही तर अनेक तांत्रिक कामांना योग्य हात नाही. मात्र संजीवनीच्या व्यवस्थापनाने या विसंगतीची वेळीच दखल घेऊन उद्योगजगताला हव्या असलेल्या मनुष्यबळाचा गांभीर्याने विचार केला. यामुळे संजीवनी ग्रामीण भागात असूनही विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवून देण्यास यशस्वी होत आहे. वयाच्या १९व्या वर्षी ग्रामीण भागातील मुले-मुली कमावते होऊन कुटुंबांचा आधार बनत आहेत, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे, संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, व्यवस्थापकीय संचालक अमित कोल्हेे आणि विश्वस्त सुमित कोल्हे यांनी यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचेही अभिनंदन केले.

------

फोटो आहे : अमित कोल्हे

Web Title: 17 students of Sanjeevani Polytechnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.