कोपरगावात मंगळवारी आढळले १५६ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:21 IST2021-04-21T04:21:30+5:302021-04-21T04:21:30+5:30
कोपरगाव : शहरासह तालुक्यात मंगळवारी (दि.२०) १५६ बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्याचा आकडा १२५७ वर गेला आहे. ...

कोपरगावात मंगळवारी आढळले १५६ बाधित रुग्ण
कोपरगाव : शहरासह तालुक्यात मंगळवारी (दि.२०) १५६ बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्याचा आकडा १२५७ वर गेला आहे. रॅपिड ॲन्टिजेन किटद्वारे ३९८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ११० व्यक्ती बाधित आढळल्या तसेच खासगी लॅब अहवालात २१, नगर येथील अहवालात २५ असे एकूण तब्बल १५६ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच १४५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच २५५ व्यक्तींच्या घशातील स्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले.
शहरातील ४६ वर्षीय पुरुष, ५७ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय महिला तर तालुक्यातील येसगाव येथील ५५ वर्षीय महिला, संवत्सर येथील ४५ वर्षीय पुरुष, हंडेवाडी येथील ६० वर्षीय महिला व कुंभारी येथील ५० वर्षीय पुरुष अशा सात जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.