सर्वेक्षणातील १५ हजार संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:32+5:302021-05-07T04:21:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शासनाने मागील आठवड्यात राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेंतर्गत जिल्ह्यात २४ हजार ३७२ ...

15,000 suspects in the survey | सर्वेक्षणातील १५ हजार संशयित

सर्वेक्षणातील १५ हजार संशयित

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शासनाने मागील आठवड्यात राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेंतर्गत जिल्ह्यात २४ हजार ३७२ संशयित रुग्ण सापडले आहेत. यातील ८ हजार ७०० जणांची कोरोना चाचणी केली आहे. मात्र, कोरोना चाचणी किटचा तुटवडा असल्याने अजूनही १५ हजार ६६५ संशयितांची चाचणीच झालेली नाही. त्यांच्यापासून इतरांना धोका संभवू शकतो.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्या अनुषंगाने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व लोकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी गावातील आरोग्य पथकाने प्रत्येक घराला भेट देऊन नागरिकांना कोरोनासंदर्भात काही लक्षणे आहेत का, याबाबत तपासणी केली. २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत हे सर्वेक्षण झाले. यादरम्यान आरोग्य पथकाने जिल्ह्यातील ७ लाख ८० हजार घरांमध्ये भेट देऊन सुमारे ३८ लाख (९० टक्के) लोकांची तपासणी केली. त्यामध्ये ९८ पेक्षा जास्त ताप असणारे, ९५ पेक्षा कमी ऑक्सिजन पातळी असलेले, १०० पेक्षा जास्त पल्स रेट असलेले, अंगदुखी, वास न येणे, चव न लागणे, जुलाब होणे, याशिवाय सर्दी, ताप, खोकला तसेच तीव्र श्वसन दाह अशी लक्षणे असलेले एकूण २४ हजार ३७२ संशयित लोक आढळले. या सर्वांना पथकाने जवळच्या कोविड सेंटरमध्ये जाऊन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. आतापर्यंत त्यातील ८७०० जणांनी कोरोना चाचणी केली. यापैकी २७६९ पॉझिटिव्ह सापडले, तर ५९२८ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या.

परंतु, अजूनही १५ हजार ६६५ संशयित असे आहेत, ज्यांनी कोरोना चाचणी केलेली नाही. मध्यंतरी कोरोना चाचणी किटचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता. अजूनही अनेक तपासणी केंद्रांवर ॲण्टििजेन चाचणीसाठी किट उपलब्ध नाहीत. त्यामुळे १५ हजार संशयित अजूनही चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरात लवकर त्यांची तपासणी झाली नाही, तर ते आपल्या कुटुंबांनाही बाधित करू शकतात. त्या अनुषंगाने शासनाने तातडीने या लोकांची तपासणी करून त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरण कक्षात पाठवावे, अशी मागणी होत आहे.

--------------

Web Title: 15,000 suspects in the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.