दहिगावच्या १२० नागरिकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:20 IST2021-05-10T04:20:45+5:302021-05-10T04:20:45+5:30
निंबळक : दहिगाव (ता. नगर) येथे १२० नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत लस घेतली. गाव तिथे मोहिमेअंतर्गत नुकतेच ...

दहिगावच्या १२० नागरिकांनी घेतली लस
निंबळक : दहिगाव (ता. नगर) येथे १२० नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत लस घेतली. गाव तिथे मोहिमेअंतर्गत नुकतेच कोरोना लसीकरण यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडलेल्या लसीकरण मोहिमेत गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, माजी उपसभापती रवींद्र भापकर यांच्या नियोजनातून तसेच सरपंच मधुकर म्हस्के यांच्या पाठपुराव्यातून लसीकरण शिबिर घेण्यात आले. शिस्तबद्ध पद्धतीने लस घेण्यासाठी कोरोना समितीने नियोजन केले. शिबिर यशस्वीतेसाठी उपसरपंच महेश म्हस्के, डॉ. सूर्यकांत यादव, डॉ. मनीष हिवाळे, आरोग्यसेविका मनीषा बनसोड, संदीप भालसिंग, आशा पर्यवेक्षक विजया लंके, अंगणवाडी सेविका कमल जरे, आशा सेविका आशा जाधव, सुनीता वाघ, संजय अन्हाड, ग्रामपंचायत कर्मचारी पाराजी माने आदींनी परिश्रम घेतले.