अनुदानाअभावी राज्यातील १२ हजार ग्रंथालये अडचणीत
By Admin | Updated: August 24, 2014 23:07 IST2014-08-24T23:06:53+5:302014-08-24T23:07:34+5:30
राहुरी : अनुदानाअभावी राज्यात बारा हजार गं्रथालये अडचणीत आले असून अहमदनगर जिल्ह्यात ५३७ ग्रंथालयांना अनुदान न मिळाल्याने सेवा व दर्जावर परिणाम झाला आहे़

अनुदानाअभावी राज्यातील १२ हजार ग्रंथालये अडचणीत
राहुरी : अनुदानाअभावी राज्यात बारा हजार गं्रथालये अडचणीत आले असून अहमदनगर जिल्ह्यात ५३७ ग्रंथालयांना अनुदान न मिळाल्याने सेवा व दर्जावर परिणाम झाला आहे़ शासनाने त्वरित अनुदान देऊन गं्रथालयांना संजीवनी द्यावी, अशी मागणी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गं्रथमित्र मुरलीधर नवाळे यांनी केली आहे़
ग्रंथालयांना अ, ब, क, ड या दर्जानुसार अनुदान दिले जाते़ दरवषी आॅगस्ट व मार्चमध्ये प्रत्येकी पन्नास टक्के अनुदान दिले जाते़ गेल्या दहा वर्षांत अनुदानात वाढ झालेली नाही़ मागील वर्षी पन्नास टक्के वाढ दिली़ मात्र तपासणीतील त्रुटीमुळे रक्कम मिळालेली नाही असे ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे यांनी सांगितले़ शासनाचे धोरण न बदलल्यास गं्रथालये नामशेष होण्याची भीती नवाळे यांनी व्यक्त केली आहे़ गाव तेथे वाचनालय व ई-लायब्ररी सुरू करण्याची घोषणा केली होती़ परंतु प्रत्यक्षात गावोगावी वाचनालये झालीच नाहीत. त्यामुळे ही घोषणा हवेतच विरली.शासनाने ग्रंथालयांचे अनुदान चौपट केले तरच चांगली सेवा देऊन ग्रंथालयाचा दर्जा कायम राखता येईल, असे नवाळे यांनी सांगितले़ (तालुका प्रतिनिधी)