अंबिका विद्यालयाचे १२ विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीस पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST2021-08-21T04:25:29+5:302021-08-21T04:25:29+5:30
केडगाव : केडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयाचे बारा विद्यार्थी राष्ट्रीय ...

अंबिका विद्यालयाचे १२ विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीस पात्र
केडगाव : केडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयाचे बारा विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत.
एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्राजक्ता गाडेकर , धनश्री खरमाटे, महेश बडे, वैभव डेंगळे, आदित्य पुंड, ओंकार पाटोळे, मानसी जाधव, रेणुका यादव, श्रेया गाडेकर,
विशाल दराडे, शुभम घोरपडे, सायली खरमाटे हे बारा विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पात्र झाले..
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजी भोर, स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, पर्यवेक्षक सुरेश थोरात, गुरूकुल प्रमुख कैलास आठरे, विभाग प्रमुख प्रदीप गारूडकर, सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.