१२ अहवाल निगेटिव्ह; ३७ अहवालांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 15:17 IST2020-05-03T15:16:12+5:302020-05-03T15:17:06+5:30
अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी १२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित ३७ अहवालांची प्रतीक्षा असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.

१२ अहवाल निगेटिव्ह; ३७ अहवालांची प्रतीक्षा
अहमदनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी १२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित ३७ अहवालांची प्रतीक्षा असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
शनिवारी (२ मे) रात्री पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथील एक व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले होते. तसेच उर्वरित १२ अहवाल शनिवारी रात्री उशीरा प्राप्त झाले. दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींसह इतर असे एकूण ३७ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.