थोरात कारखान्याचे १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:21 IST2021-04-21T04:21:32+5:302021-04-21T04:21:32+5:30
ओहोळ यांनी म्हटले आहे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भविष्याचा विचार करत दूरदृष्टीने घेतलेल्या ५ हजार ५०० मेट्रिक टन व ...

थोरात कारखान्याचे १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
ओहोळ यांनी म्हटले आहे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भविष्याचा विचार करत दूरदृष्टीने घेतलेल्या ५ हजार ५०० मेट्रिक टन व ३० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाचा निर्णय घेतला. तो अत्यंत लाभदायी ठरला असून, तो राज्याला दिशादर्शक ठरला आहे. चालू हंगाम हा साखर कारखान्यांसाठी अत्यंत अडचणीचा होता. विक्रमी उसाचे उत्पादन, कोरोनाचे संकट, लॉकडाऊनचा प्रश्न, साखरेचे कमी झालेले भाव या सर्व पार्श्वभूमीवर थोरात सहकारी साखर कारखान्याने आपला लौकिक कायम ठेवताना ६००० मेट्रिक टन दैनिक गाळप क्षमता असलेल्या नव्या कारखान्यावर १७२ दिवसांमध्ये विक्रमी १२ लाख २९ हजार ६१० मेट्रिक टनाचे गाळप केले असून, १२ लाख ३६ हजार २९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यापूर्वी ११ लाख ५३ हजार मेट्रिक टनाचे गाळप कारखान्यातून झाले होते. तो उच्चांक मोडीत काढत यावर्षी १२ लाख २९ हजार ६१० मेट्रिक टनाचे गाळप झाले असून, अजूनही कारखाना सुरू आहे. यामुळे राज्यातून ऊस गाळपमध्ये प्रथम असलेल्या वीस कारखान्यांमध्ये थोरात कारखान्याचा अग्रभागी नंबर राहिला आहे. चालू हंगामातच कारखान्याने ४० हजार लिटर क्षमतेचा नवीन डिस्टिलरी प्रकल्पही कार्यान्वित केल्याने उपपदार्थ निर्मिती वाढली आहे.