चारा पिकासाठी ११० मेट्रिक टन बियाणे मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:19 IST2021-05-22T04:19:03+5:302021-05-22T04:19:03+5:30
देशमुख म्हणाले की, महसूलमंत्री व संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला ...

चारा पिकासाठी ११० मेट्रिक टन बियाणे मोफत
देशमुख म्हणाले की, महसूलमंत्री व संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाल्याने दुधाची मागणी घटली आहे.
त्याचा तोटा दूध संघ व दूध उत्पादक शेतकरी यांना मोठ्या प्रमाणावर झाला आहे. दूध उत्पादक हा दूध संघाचा पाया असून, अडचणीच्या काळात दूध उत्पादकांना मदत व्हावी, यासाठी राजहंस दूध संघाने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे चारा बियाणे मागणी केली होती. त्यापैकी ११० मेट्रिक टन बियाणे प्राप्त झाले असून, येत्या चार-पाच दिवसात मका, ज्वारी, बाजरी, गवत या चारा पिकांचे बियाणे स्थानिक दूध संस्थाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोफत वितरण करण्यात येणार आहे.
अडचणीच्या काळात राजहंस दूध संघ नेहमी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. दूध उत्पादकांना दूध उत्पादनावरील खर्च कमी व्हावा व उत्पादन वाढवावे, यासाठी विविध योजना राबवत आहे. दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी उच्च प्रतीचे राजहंस पशुखाद्य, मिनरल मिक्चर, कॅल्शियम, उत्पादकांसाठी अनुदानित तत्त्वावर उपलब्ध केले आहे, असेही देशमुख म्हणाले.