११ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST2021-05-12T04:20:55+5:302021-05-12T04:20:55+5:30

शेवगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील खुंटेफळ येथे ११ वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या कोणी ...

11-year-old boy strangled to death | ११ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या

११ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या

शेवगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील खुंटेफळ येथे ११ वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या कोणी व का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोमवारी सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सार्थक अंबादास शेळके असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव असून तो इयत्ता ५ वी मध्ये शिक्षण घेत होता. या प्रकरणी अंबादास दत्तू शेळके (रा. खुंटेफळ, ता. शेवगाव) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शेतकरी अंबादास हे सोमवारी (दि.१०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जेवण करून पत्नी संगीता, मुलगी दिव्या, सार्थक व सिद्धार्थ असे सर्वजण त्यांच्या मालकीच्या घराजवळील वाडग्यात गेले होते. तेथे घर बांधण्यासाठी जेसीबीने खड्डे खोदण्याचे काम चालू होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठा मुलगा सार्थक घरी गेला होता.

त्यावेळी बाकीचे इतर सर्व वाडग्यात काम करीत होते. सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास अंबादास यांनी त्यांचा लहान मुलगा सिद्धार्थ यास मोबाईल आणण्यासाठी घरी पाठविले. काही वेळाने लहान मुलगा सिद्धार्थ घाबरून वडिलांकडे पळत आला. सार्थक हा घरात पडला असून त्याचे खूप रक्त सांडले आहे, असे सिद्धार्थ याने वडिलांना सांगितले. त्यामुळे सर्वांनी घराकडे धाव घेतली. सार्थक हा घरात उताणा पडलेला होता. त्याच्या मानेवर मारलेले दिसत होते. त्यातून रक्त येत होते. तो पडलेल्या ठिकाणी घरात रक्त वाहत होते. तो हालचालही करीत नव्हता. ते पाहून अंबादास व संतोष काळे यांनी सार्थक यास दुचाकीवरून सरकारी दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी सार्थकला मृत घोषित केले.

Web Title: 11-year-old boy strangled to death