कत्तलीच्या संशयावरुन ११ कालवडी पकडल्या
By Admin | Updated: September 20, 2015 00:49 IST2015-09-20T00:39:00+5:302015-09-20T00:49:38+5:30
अहमदनगर : कत्तलीसाठी आणलेल्या ११ कालवडी तोफखाना पोलिसांनी कुरेशी गल्लीतून ताब्यात घेतल्या. सदर कालवडी एका टेम्पोतून गोशाळेत रवाना केल्या आहेत.

कत्तलीच्या संशयावरुन ११ कालवडी पकडल्या
अहमदनगर : कत्तलीसाठी आणलेल्या ११ कालवडी तोफखाना पोलिसांनी कुरेशी गल्लीतून ताब्यात घेतल्या. सदर कालवडी एका टेम्पोतून गोशाळेत रवाना केल्या आहेत. या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुरेशी गल्ली परिसरात एकाच ठिकाणी ११ जर्सी कालवडी असून त्या कत्तलीसाठी आणल्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी एका पथकाला घेऊन शनिवारी दुपारी ही कारवाई केली. त्यामध्ये ११ कालवडी आढळून आल्या. त्या कोणाच्या आहेत, याची चौकशी केली असता, त्याबाबत कोणीही माहिती दिली नाही. तसेच परिसरात काही कत्तलखाने असल्याने कालवडी कत्तलीसाठीच आणल्याची पोलिसांची खात्री पटली. त्यामुळे या कालवडी ताब्यात घेण्यात आल्या. या कालवडी शहराजवळील गो-शाळेत पाठविण्यात येतील, असे मोरे यांनी सांगितले. मोरे यांच्या पथकातील अभय कदम, शब्बीर शेख यांनी ही कारवाई केली. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर माहिती मिळाल्यानंतर काही मिनिटांमध्येच पोलीस निरीक्षक मोरे यांनी तातडीने ही कारवाई पूर्ण केली. (प्रतिनिधी)