रविवारी १०९ जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:37+5:302021-02-05T06:41:37+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी १०९ जण बाधित आढळले, तर ८५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची ...

109 people affected on Sunday | रविवारी १०९ जण बाधित

रविवारी १०९ जण बाधित

अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी १०९ जण बाधित आढळले, तर ८५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ५६० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२० टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९१४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४४, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१ आणि ॲन्टिजेन चाचणीत १४ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (४१), जामखेड (१), कर्जत (६), कोपरगाव (९), नगर ग्रामीण (१८), पारनेर (२), पाथर्डी (५), राहाता (८), नेवासा (१), पारनेर (२), राहुरी (३), संगमनेर (६), शेवगाव (१), श्रीरामपूर (५), श्रीगोंदा (१) येथील रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: 109 people affected on Sunday