१ हजार ज्येष्ठांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:39 IST2021-03-04T04:39:33+5:302021-03-04T04:39:33+5:30

मात्र लसीकरण मोहीम सुरळीत सुरू झाली. बुधवारी जिल्ह्यातील १४ ग्रामीण रूग्णालयांमध्ये ६० वर्षांवरील एकूण ७९२, तर ४५ वर्षांवरील १७१ ...

1000 senior citizens took the vaccine | १ हजार ज्येष्ठांनी घेतली लस

१ हजार ज्येष्ठांनी घेतली लस

मात्र लसीकरण मोहीम सुरळीत सुरू झाली. बुधवारी जिल्ह्यातील १४ ग्रामीण रूग्णालयांमध्ये ६० वर्षांवरील एकूण ७९२, तर ४५ वर्षांवरील १७१ जणांनी लस घेतली. त्यात जिल्हा रूग्णालयात दिवसभरात दीडशे ज्येष्ठांनी लस घेतली. लसीकरण मोहिमेस आता गती येत असून लस घेणारांचाही प्रतिसाद वाढत आहे. सध्या जिल्हा रूग्णालय, २ उपजिल्हा रूग्णालये, ११ ग्रामीण रूग्णालये, तसेच मनपाच्या आठ रूग्णालयांत मोफत लस उपलब्ध आहे. कोविन डाॅट जीओव्ही डॉट ईन या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर संबंधितांना जवळच्या केंद्रावर लस उपलब्ध होत आहे.

-----------

३२ खासगी रूग्णालयात आजपासून लस

नगर जिल्ह्यात ३२ खासगी रुग्णालये लसीकरण केंद्र म्हणून जाहीर झाले आहेत. तेथे अडीचशे रूपयात लस मिळणार आहे. या रूग्णालयांनी शासनाकडे लसीचे पैसे भरले असून त्यांच्या मागणीप्रमाणे जवळच्या ग्रामीण रूग्णालयातून त्यांना लस उपलब्ध होत आहे. बुधवारी सुमारे आठ हजार डोस खासगी रूग्णालयांना देण्यात आले. तेथे गुरूवारपासून लसीकरण सुरू होत आहे.

------------

फोटो - ०३कोरोना व्हॅक्सिनेशन

जिल्हा रूग्णालयात बुधवारी ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस टोचताना आरोग्य कर्मचारी.

Web Title: 1000 senior citizens took the vaccine