जिल्ह्यात शंभर टक्के पाऊस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:13 IST2017-08-29T19:07:59+5:302017-08-29T19:13:49+5:30

जिल्ह्यात आठवड्यापासून दमदार पाऊस सुरुच असून आतापर्यत जिल्ह्यात १०० टक्के पावसाने हजेरी लावली अहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे.

100% rain in the district | जिल्ह्यात शंभर टक्के पाऊस 

जिल्ह्यात शंभर टक्के पाऊस 

ठळक मुद्देपाच तालुक्यांनी शंभरी ओलांडलीसहा नव्वदीपार

लोकमत न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : जिल्ह्यात आठवड्यापासून दमदार पाऊस सुरुच असून आतापर्यत जिल्ह्यात १०० टक्के पावसाने हजेरी लावली अहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. जिल्ह्यात काल दिवसअखेर तब्बल ९९.७८ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. अद्याप परतीचा मान्सून हजेरी लावणार असल्याने यंदा विक्रमी पावसांची नोंद होण्याची शक्यता आहे.
 
आठवड्यापासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दमदार पाऊस सुरु आहे. सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात झाला आहे. आतापर्य त अकोले तालुक्यात १५३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अद्यापपर्यत अकोले तालुक्यात ७६० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल १२१ टक्के  पाऊस राहाता तालुक्यात झाला आहे. आतापर्यत ५३३ मिलीमीटर पावसाची नोंद राहाता तालुक्यात झाली आहे. त्यानंतर ११५ टक्के पाऊस कर्जत तालुक्यात झाला आहे. त्याखालोखाल नेवासा तालुक्यात ११३ टक्के पावसांची नोंद झाली आहे. सर्र्वात कमी पाऊस कोपरगाव तालुक्यात झाला आहे. कोपरगावमध्ये आतापर्यत ६८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यत सरासरी ४९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण ९९.७८ टक्के आहे. 

तालुकानिहाय मिलीमीटरमध्ये पाऊस  पावसाची टक्केवारी
तालुका- पाऊस - टक्केवारी
अकोले - ७६० - १५३.९७ 
राहाता -५३३- १२१.०८
नेवासा -६०२-११३.३१
जामखेड - ६३०-१००.७२
पारनेर -४५८- ९६.६४
श्रीगोंदा -४२८-९५.४१
नगर - ५००- ९५.३७
श्रीरामपूर -४२७- ९०.८७
राहुरी-४४०- ९१.८१
शेवगाव -५१९- ९२.४२
पाथर्डी -४५५-८२.६१
संगमनेर -३०९- ७४.१७
कोपरगाव - ३०१ - ६८.३८
एकूण - ९९.७८

Web Title: 100% rain in the district