१०० टक्के शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:33 IST2021-02-05T06:33:51+5:302021-02-05T06:33:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेवगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेल्या शाळा पुन्हा सुरळीतपणे सुरु झाल्या आहेत. ५ ते ८ ...

१०० टक्के शाळा सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
शेवगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेल्या शाळा पुन्हा सुरळीतपणे सुरु झाल्या आहेत. ५ ते ८ इयत्तेपर्यंतच्या शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषदसह इतर शाळा शंभर टक्के सुरु झाल्या आहेत. उच्च प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तालुक्यातील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली असल्याचे उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने मागील वर्षी २३ मार्च रोजी शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याची घोषणा केली होती. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी होत असताना मागील वर्षी २३ नोव्हेंबरपासून ९वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील ६४ पैकी ५६ शाळा सुरु झाल्या आहेत. त्या शाळांतील १९ हजार ४४४ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ८३६ विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहेत. तर त्यांना ज्ञानदानाचे कार्य करणारे ८०९ शिक्षकांपैकी ७७९ शिक्षकांनी कोरोना चाचणी केली आहे. त्यातील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या एकूण पटापैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी अद्यापही शाळेत येत नसल्याचे मिळालेल्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. आपल्या पाल्यांना शाळेत उपस्थित राहण्यासंदर्भात ९ हजार ४१६ पालकांनी संमतीपत्र शाळेत जमा केले असूनही त्यातील सुमारे दोन हजार विद्यार्थी अद्यापही शाळेत येत नाहीत. सुमारे दहा हजार पालकांनी अद्यापही संमतीपत्र दिले नसल्याचे समोर आले आहे.
५ ते ८ पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या ४४ तर इतर ५३ म्हणजेच १०० टक्के शाळा सुरु झाल्या आहेत. त्यांना अध्यापनाचे कार्य करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या १४२ तर इतर संस्थांच्या ३५३ शिक्षकांनी कोरोना चाचणी केली आहे. त्यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकूण १ हजार ६३६ विद्यार्थ्यांपैकी १ हजार १२६ विद्यार्थी नियमित शाळेत उपस्थिती लावत आहेत. तर इतर शाळांतील १६ हजार ९१ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ९५० विद्यार्थी शाळेत उपस्थिती लावत आहेत. सदरची आकडेवारी १ फेब्रुवारी रोजीची आहे.
....
शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतांना पालकांनी संमतीपत्र देणे आवश्यक आहे. माध्यमिकच्या बहुतांशी पालकांनी अद्याप संमतीपत्र दिले नाही. त्यामुळे माध्यमिक शाळात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. उपस्थिती वाढविण्यासाठी पालकांशी संपर्क साधला जात आहे.
-रामनाथ कराड, गट शिक्षण अधिकारी, शेवगाव.
..
०२ फोटो
...