शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

दहा लाखांचे बोगस बिल

By admin | Updated: June 27, 2023 10:51 IST

अहमदनगर : रस्त्याच्या दुरुस्तीचे १० लाखांचे बोगस देयक महापालिकेच्या बांधकाम विभागाने अदा केल्याचा आरोप आहे़

अहमदनगर : रिलायन्स जीओ इन्फोकॉ लिमिटेड कंपनीचे केबल टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे १० लाखांचे बोगस देयक महापालिकेच्या बांधकाम विभागाने अदा केल्याचा आरोप करत ‘काम दाखवा आणि २१ हजारांचे बक्षीस मिळवा’, असे आव्हानच मनसेचे नगरसेवक किशोर डागवाले यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाव्दारे दिले आहे़रिलायन्स कंपनीची केबल टाकण्याचे काम घेतलेल्या ठेकेदार संस्थेकडून प्रोफेसर चौक ते समर्थ नगर आणि कुष्ठधाम चौक ते गुलमोहर रस्ता परिसरातील रस्ते खोदण्यात आले़ त्यामुळे हा रस्ता उखडला गेला़ हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने ९ लाख ९० हजारांचे अंदाजपत्रक तयार केले़ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम महावीर संस्थेस देण्यात आले़ संबंधित संस्थेस ४ मार्च रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला़ परंतु या संस्थेने रस्ता दुरुस्तीचे काम केले नाही़ काम न करताच महापालिकेच्या बांधकाम विभागाने २७ जून रोजी संबंधित संस्थेस ९ लाख ९० हजारांचे देयक अदा केले असल्याचे मनसेचे नरसेवक कैलास गिरवले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़महापालिकेने काम न करताच बोगस देयक अदा केले़ प्रत्यक्षात जागेवर कुठलेही काम संस्थेने केले नाही़ मात्र देयक अदा करण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून देत गिरवले यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली़ तसेच महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांनी काम दाखाविल्यास त्यांना २१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे़ गिरवले यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली होती़ त्यानंतर त्यांनी आयुक्त कुलकर्णी यांना काम दाखवा आणि बक्षीस मिळवा,असे आव्हान दिले आहे़ त्यामुळे महापालिकेत मनसे विरुध्द आयुक्त, असा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ (प्रतिनिधी)