शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नगर-मनमाड रोडवर २३ लाखांचे मद्यार्क जप्त; दोघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 17:51 IST

राज्य उत्पादन शुल्कच्या श्रीरामपूर येथील पथकाने शनिवारी सायंकाळी नगर-मनमाड रोडवरील बाभळेश्वर शिवारात एका ट्रकचा पाठलाग करून २२ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १८ हजार लीटर मद्यार्क जप्त केले आहे. 

अहमदनगर: राज्य उत्पादन शुल्कच्या श्रीरामपूर येथील पथकाने शनिवारी सायंकाळी नगर-मनमाड रोडवरील बाभळेश्वर शिवारात एका ट्रकचा पाठलाग करून २२ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १८ हजार लीटर मद्यार्क जप्त केले आहे. या मद्यार्काची अवैधरित्या वाहतूक केली जात होती़. यावेळी एम़एच-१८ ए़ए़ ५५६८ या ट्रकसह चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. नगर-मनमाड रोडने बेकायदेशीररित्या दारु तयार करण्यासाठी वापरल्या जाणा-या मद्यार्काची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. माहितीनुसार पथकाने ट्रक चालकला अडविले. यावेळी या ट्रकमध्ये मद्यार्काचे ७५ बॅरल त्यात प्रत्येकी ३४० लिटर मद्यार्क असे एकूण १८ हजार बॅरल लिटर अवैध मद्यार्क आढळून आले. यावेळी वाहनचालक इंद्रसिंग गुलाब भिल (वय ३८  रा. वाडी ता. शिरपूर जि. धुळे) व चंदू अर्जून वानखेडे (४२ रा. आमोदा ता. शिरपूर जि. धुळे) यांना अटक करण्यात आली. ट्रकच्या बॅरलमधील मद्यार्काचे नमुने पृथक्करणासाठी घेण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. अहवालानंतर जप्त केलेले रसायन कशापासून तयार करण्यात आले आहे.  याप्रकरणी उत्पादन शुल्कचे जवान प्रवीण साळवे यांनी आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. रविवारी अटक केलेल्या दोघांना  राहाता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.  राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल पाटील, निरिक्षक संजय सराफ, अण्णासाहेब बनकर, भैय्यासाहेब घोरतळे यांच्यासहप्रकाश अहिरराव, कैलाश छत्रे, धवल गोलेकर, अजित बडदे, दुय्यम निरीक्षक विकास कंठाळे, प्रवीण साळवे, राजेंद्र कदम, जवान दीपक बर्डे, वर्षा जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस