शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

१ लाख ४५ हजार विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न होता या विद्यार्थ्यांना पुढील ...

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न होता या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय मागील आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. त्यानंतर बुधवारी पुन्हा नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबतही शिक्षण मंत्र्यांनी हाच निर्णय कायम ठेवला. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न होता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल, असे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले. नगर जिल्ह्यात पहिली ते आठवीचे सुमारे सव्वा सहा लाख विद्यार्थी आहेत. त्याप्रमाणे नववीचे ८१ हजार २०० व अकरावीचे ६३ हजार ८२२ असे एकूण १ लाख ४५ हजार विद्यार्थी संख्या मागील वर्षीच्या पटसंख्यानुसार आहे. या सर्वांना आता परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.

आता केवळ दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत ठोस निर्णय झालेला नाही. तोही लवकरच होईल. दहावी बारावीची परीक्षा ऑफलाइन होणार आहे. परंतु तरीही सध्याच्या वेळापत्रकात बदल होणार की आणखी काही वेगळा पर्याय समोर येणार याबाबत लवकरच निर्णय जाहीर करू, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

----------------

नववी व अकरावीचे तालुकानिहाय विद्यार्थी

तालुका नववी अकरावी

अकोले ५०५६. ३७१८

जामखेड २५४४. २९०४

कर्जत ३७९६. ३३०७

कोपरगाव ६४१४. ४६१९

महापालिका ६८९२. ७७०२

नगर ५८५३. २८४४

नेवासा ६८८४. ४०९३

पारनेर ४५३८. ३२२१

पाथर्डी ४६४५. ५४४५

राहाता ६२३९. ५०९८

राहुरी ५२१५. २८७३

संगमनेर ८६४०. ६५८४

शेवगाव ४४९१. ४४४०

श्रीगोंदा ४६७६. ३४४४

श्रीरामपूर ५३२७. ३५३०

----------------------------------------

एकूण ८१२००. ६३८२२