ठळक मुद्देआजीचा मृत्यूचार वर्षीय नातू गंभीर जखमी
आळेफाटा : रस्ता ओलांडताना दुधाच्या टँकरची धडक बसून एक महिला जागीच ठार तर चार वर्षांचा चिमुरडा बालक गंभीर जखमी झाला. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव येथे मंगळवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हा अपघात घडला. मंदाबाई अरुण कोकाटे (वय ४०,रा. कोठे खुर्द, ता. संगमनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार कैलास परांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदाबाई कोकाटे या चिमुरडा नातू पार्थ गुलाब कोकाटे (वय ४) यास घेऊन नाशिक पुणे महामार्ग ओलंडत होत्या. तेव्हा घारगाव बस थांब्याजवळ बाभळेश्वरकडून मुंबईला दूध घेऊन वेगाने जाणाºया टँॅकरने (क्रमांक एम. एच. १४ बी जे ९२९३) जोराची धडक दिली. या धडकेत मंदाबाई कोकाटे जागीच ठार झाल्या. तर पार्थ गंभीर जखमी झाला. जखमी पार्थ यास ग्रामस्थांनी उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. टँकर चालक योगेश पुरी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. दुधाच्या टँकरची धडक बसून १ ठार, १ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 18:14 IST