शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

झेन कथा : घोडा आणि म्हैस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 01:48 IST

मला ही कथा खूप आवडते.

धनंजय जोशीएक जण आपल्या घोड्यावरून खूप वेगाने जात असतो. त्याचा मित्र त्याला विचारतो, ‘अरे, तू कोठे चाललास?’ तो मित्र म्हणतो, ‘मला का विचारतोस? या घोड्याला विचार!’ आपले मन आपल्याला त्या घोड्याप्रमाणे कुठे कुठे घेऊन जात असते. खरे की नाही? आणखी एक उदाहरण म्हणजे आपण म्हशीची शेपटी घट्ट धरून ठेवायची आणि म्हणत राहायचे, ‘अगं अगं, म्हशी मला कुठे नेशी?’ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या हे लक्षातपण येत नाही. कारण आपण खरे पहिले तर आपण प्रत्येक क्षणाकडे नीट बघतच नाही. आपल्या मनाला ते शिकवले गेले नाही तर आपण बघणार कसे? त्याच्यासाठी साधना पाहिजे. काळजी घेऊन प्रत्येक क्षणाकडे आणि आपल्या मनाकडे बघितले पाहिजे.

एक साधी गोष्ट करून पहावी. सगळ्यांना ज्ञान शिबिराला जायची संधी मिळतेच असे नाही म्हणून सांगतो. पंधरा मिनिटे बाजूला काढून शांत बसावे आणि मनाकडे लक्ष द्यावे. मनाला सांगावे, ‘आता पुढची पंधरा मिनिटे फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष दे. दुसरे काहीही विचार येऊ देऊ नकोस.’ तुम्हाला आश्चर्य वाटेल, की इतकी साधी गोष्ट, पण तुमचे मन तुम्हाला त्या घोड्याप्रमाणे हजारो ठिकाणी घेऊन जाईल आणि एकदम लक्षात येईल, ‘अरेरे, पंधरा मिनिटे होऊन गेली केव्हाच!’ एक महत्त्वाची गोष्टपण आपल्याला कळून चुकेल. ती म्हणजे मनाला साधनेची आवड करून देणे किती आवश्यक आहे ते ! माझ्या गुरुंनी एक साधा उपाय सांगितला होता. ते म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा मन नको ते विचार घरामध्ये येऊ देते, तेव्हा त्याला शांतपणे सांगावे - ‘नॉट नाऊ - आता नाही’ आणि बघा, की ते कसे सरळ मागल्या दाराने बाहेर निघून जातात !

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक