शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जिसके मन मे प्रज्ञा जगी- होय विनम्रता विनित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 13:17 IST

महापुराच्या विरोधात उभे राहणारे वृक्ष उन्मळून पडतात. याउलट नदीपत्रातील लव्हाळ्याची पाती सकाळच्या वेळी सुर्यकिरणांनी न्हाऊन निघतात.

- दत्ता कोहिनकर-     सकाळच्या रम्य प्रहरी केंद्रात फिरत असताना आचार्य सत्यनारायण गोएंकाजींचा एक दोहा कानावर पडला, जिसके मन मे प्रज्ञा जगी- होय विनम्रता विनित। जिस डाली को फल लगे-  झुकने की ही रीत॥     मला महात्मा गांधीची आठवण झाली. एकदा गांधीजी-चार्ली चॅप्लिनला भेटण्यासाठी त्यांच्या छोट्या घरी गेले. भेटून झाल्यावर गांधीजींनी चॅप्नीलला विचारले.आमच्या प्रार्थनेची एक झलक तुम्हाला पाहायची आहे का? चॅिप्लनन उत्तर दिलं कि त्याच घर खूपच लहान असून प्रार्थना करणार कोठे? गांधीजी म्हणाले तुम्ही सोफ्यावर बसा, आम्ही खाली बसून प्रार्थना करू. त्याचप्रमाणे त्यांनी केल सुद्धा. पुढे चॅप्लिनन लिहिलंय, गांधीजी व त्यांच्या साथीदारांना माज्या पुढेच जमिनीवर बसण्याची लाज बिलकुल वाटली नाही पण मी मात्र त्यांच्यापुढे वर सोफ्यावर बसून खाली पाहताना खजिल झालो होतो. खरोखर मित्रांनो आयुष्यात महत्त्कार्य करताना विनम्रता ह्या गुणाचा विकास करावा लागतो. अहंकाराचा त्याग करावा लागतो. सिकंदरने जग जिंकले होते. मृत्यूपत्रात त्याने अंत्ययात्रेच्या वेळेस माझ्या हाताचे तळवे आकाशाकडे मोकळे दिसतील अशा पद्धतीने माझी अंत्ययात्रा काढा असा उल्लेख केला होता. मृत्यूपत्राच्या माध्यमातून सिकंदरने आपल्या सर्वांना एक संदेश दिला होता, मी सिंकदर मी जग जिंकले पण खाली हाताने आलो होतो आणि खाली हातानेच परत चाललोय. म्हणून कितीही पैसा, प्रतिष्ठा, सत्ता मिळवली तरी वृथा अभिमान बाळगु नका, नेहमी न रहा. म्हणतात ना महापुरे झाडे जाती-तेथे लव्हाळे वाचती. महापुराच्या विरोधात उभे राहणारे वृक्ष उन्मळून पडतात. याउलट नदीपत्रातील लव्हाळ्याची पाती सकाळच्या वेळी सुर्यकिरणांनी न्हाऊन निघतात. विनयशीलतेचे महिमान सांगताना बसवेश्वर विचारतात. गाय आपल्या पाठीवर बसणाऱ्यांना कधी दूध देईल का? ज्याला दुध हवे त्याने गाईच्या पायाशी बसावयास शिकले पाहिजे.ज्याला दुध हवे त्याने गाईच्या पायाशी बसावयास शिकले पाहिजे.बहिणाबाई चौधरीच्या काही स्फुट ओव्या आहेत. एका ओवीत बाभळीचे पान केळीच्या पानाशी बोलते. फाट आता टराटरा-नाही दया तुफानाला।हाले बाभळीचे पान - बोले केळीच्या पानाला॥ बाभळीचे पान तसे अगदी लहान, केळीचे पान तुलनेने महान सोसायट्याच्या वाराला केळीचे पान अडवू पाहते व आपला उर फोडून घेते. बाभळीचे पान वाºयाला कौतुकाने कुरवाळते त्यामुळे वारा त्या लहानग्याला खांद्यावर घेऊन नाचतो. संत तुकाराम महाराज पण म्हणतात ना - लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा । हे लहानपण म्हणजे आपले अवमुल्यन नव्हे - तर हे असते सभ्यतेचे सार. सभ्यतेमुळे माणूस संयमी व शांत होतो..  

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकMeditationसाधना