शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - जीवसृष्टीचे कल्याण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 02:26 IST

अनेक धोरणकर्ते एका यशस्वी संस्कृतीने प्रभावित झाले आहेत आणि ती इतरत्र अमलात आणताना अनेक दु:खं आणि संकटे ओढवून घेतली आहेत

सद्गुरू जग्गी वासुदेवविकास आणि समृद्धी म्हणजे काय, हे आपण पुन्हा एकदा समजावून घेणे आवश्यक आहे. समृद्धी म्हणजे केवळ जे आहे त्यापेक्षा अधिक, त्यापेक्षा अधिक, त्याहीपेक्षा अधिक असे नाही. आपल्याला जगण्यासाठी केवळ एकच ग्रह उपलब्ध आहे. आपण निरंतरपणे अधिक आणि अधिक पाहिजे याच्या मागे लागू शकत नाही. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या संसाधनांमधूनच प्रत्येकाचे कल्याण करण्याचे मार्ग समाजाने शोधून काढणे आवश्यक आहे. आशियामधील सर्वांत मोठे दु:ख म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये अनेक देशांनी पाश्चात्य देशांच्या समाजाने त्यांना कसे घडविले याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे पूर्वेकडील लोकांचे विचार, भावना आणि कार्य करण्याच्या चौकटीत बसलेले नाही आणि त्यामुळे लोकांना भयंकर संघर्षाचा सामना करावा लागत आहे.

अनेक धोरणकर्ते एका यशस्वी संस्कृतीने प्रभावित झाले आहेत आणि ती इतरत्र अमलात आणताना अनेक दु:खं आणि संकटे ओढवून घेतली आहेत. हे योग्य किंवा अयोग्य आहे हा प्रश्न मुळीच नाही. हा प्रश्न केवळ एखादी संस्कृती किंवा राष्ट्रासाठी काय सुसंगत असेल याचा आहे. इतिहासात प्रथमच, एक मानवजात म्हणून, आपल्याकडे पृथ्वीवरील लोकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असणारी संसाधने, तंत्रज्ञान व क्षमता उपलब्ध आहे. सर्वसमावेशक मानवी चैतन्य या एकाच गोष्टीचा अभाव जाणवतो. समाजाने अशा योग्य व्यक्ती निर्माण करणे आवश्यक आहे, ज्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सर्वव्यापी दृष्टिकोन आहे. जर सहृदय आणि करुणेने भरलेली अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल, जेथे प्रत्येक मनुष्याला आपले कार्यकौशल्य वापरता येऊ शकते, तर हे फार महत्त्वाचे आहे. सामाजिक धोरणे अधिकाधिक सर्वसमावेशकतेच्या जाणिवेतून आली पाहिजेत. मुख्यत: प्रत्येक मनुष्याने पृथ्वीवरील सर्व जिवांच्या कल्याणाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. हेच मूलभूत धोरण असले पाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक