वास्तू टिप्स भाग 5
By Admin | Updated: August 10, 2016 12:20 IST2016-08-02T14:58:06+5:302016-08-10T12:20:07+5:30
आरोग्यदायी जीवनासाठी घरा मध्ये पिवळा , काळा , लाल हे रंग कोठेही येऊ देवू नये .

वास्तू टिप्स भाग 5
>- मकरंद सरदेशमुख
- आरोग्यदायी जीवनासाठी घरा मध्ये पिवळा , काळा , लाल हे रंग कोठेही येऊ देवू नये .
- घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोअरिंग , विहीर पाण्याची टाकी बांधु नये .
- दक्षिणेला पाय करून झोपु नये कारण आरोग्य, ,पैसा व मानसिक ताण यांची हानी होते .
- घराच्या मुख्य दरवाजा जवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते .
- घराच्या मुख्य दरवाजा समोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक ,शारीरिक व मानसिक हानी होते .
- हिंस्र पशु पक्षांची, जंगली जनावरांची तोंडे , घरामध्ये लावु नयेत .
- घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवु नयेत .
- उत्तम प्रगती हवी असेल तर काळ्या शाईचे पेन वापरू नयेत .
- उत्तम प्रगती साठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावी .
- कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे टाळावे.
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)