वास्तु टिप्स भाग 1
By Admin | Updated: August 10, 2016 12:16 IST2016-07-25T14:15:25+5:302016-08-10T12:16:21+5:30
नवीन घर घेताना हायवे , ओव्हर ब्रीज , खोल दरी , अनेक वर्षापासुन साठवलेले पाण्याचे तळे , पडका किल्ला , पडके बांधकाम अशा गोष्टी नवीन घर घेताना जवळपास नसाव्यात

वास्तु टिप्स भाग 1
>- मकरंद सरदेशमुख
वास्तु टिप्स १
नवीन घर घेताना हायवे , ओव्हर ब्रीज , खोल दरी , अनेक वर्षापासुन साठवलेले पाण्याचे तळे , पडका किल्ला , पडके बांधकाम , जुन्या मंदिराचे उंच शिखर आणि मोठे हॉस्पिटल अशा गोष्टी नवीन घर घेताना जवळपास नसाव्यात यामुळे आपल्या घरातील अशुभ तत्वाची वाढ होऊन शुभ तत्वाची हानी होते आणि त्यामुळे घरामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात .
रात्रीची शांत झोप यावी यासाठी उपाय योजना.
वास्तु टिप्स २
१) झोपताना पाय दक्षिणेला किंवा पुर्वेला करू नये.
२) झोपताना पाय उत्तरेला किंवा पश्चिमेला करावे.
३) बेड समोर आरसा येवु देवु नये.
४) लाल भडक रंगाची चादर किंवा बेडशीट वापरू नये.
५) बेड चौकोनी किंवा आयताकृती असावा.
६) बेड खाली स्टोरेज नसावे.
७) झोपताना मोबाईल , लॅपटॉप , कॉमप्युटर बेडच्या जवळ नसावे .
८) झोपताना टी.व्ही झाकुन ठेवावा .
९) बेडच्या खाली कागदी कपामध्ये खडे मीठ ठेवावे ते दर १५ दिवसांनी बदलावे .
१०) झोपण्याच्या आधी देवाचे नामस्मरण करून झोपावे म्हणजे शांत झोप लागते.
( रोजची शांत झोप लागणे हे आरोग्याचे चांगले लक्षण आहे )
वास्तु टिप्स ३
घराची ईशान्य दिशा , पुर्व दिशा आणि उत्तर दिशा या अतिशय शुभ दिशा आहेत या दिशांमधुन शुभ प्रवाह घरामध्ये प्रवाहित होत असतो या दिशेतील येणाऱ्या शुभ उर्जेचा व शुभ तत्वांचा घरातील सर्वांच्या सुख – समृद्धी साठी भरपुर उपयोग होतो त्यामुळे घराच्या ईशान्य दिशेमध्ये कुंचा , केरसुनी , फरशी पुसायचे फडके , जुने सामान व डस्ट बिन या गोष्टी ठेवु नयेत या गोष्टी शुभ दिशांमध्ये आल्यामुळे अशुभ तत्व वाढीस लागतात व आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येण्यास सुरवात होते.
वास्तु टिप्स ४
घरामध्ये कार , टू – व्हिलर पार्किंग करताना ईशान्य दिशेमध्ये पार्किंग करू नये आग्नेय , नैऋत्य , वायव्येला पार्किंग केले तरी चालेल कार व टू – व्हिलर पार्किंग करताना गाडीचे तोंड उत्तर - पुर्व किंवा ईशान्येला तोंड करून गाडी लावावी आणि दक्षिण दिशेला तोंड करून कोणतेही वाहन लावु नये .
वास्तु टिप्स ५
महिलांना आरोग्याच्या समस्या , ताण – तणाव , नैराश्य अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी सकाळच्या वेळेमध्ये घरामध्ये असणाऱ्या तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा सकाळी किंवा सुर्यास्था समयी घालावी प्रदक्षिणा घालताना देवाचे नामस्मरण करावे पायात चप्पल घालु नये अशा प्रदक्षिणा नित्य नियमाने घातल्यामुळे आपल्याला आरोग्य व मन : शांती नियमित लाभते.
वास्तु टिप्स ६
घराच्या शुभ प्रवेशद्वाराचे फायदे
१) घराचा दरवाजा शुभ असेल तर घरामध्ये सर्व शुभ गोष्टींचे आगमन नेहमी होते.
२) सर्व कामांना व प्रयत्नांना यश चांगले मिळते.
३) मुलांच्या अभ्यासामध्ये , शिक्षणामध्ये व आरोग्यामध्ये उत्तम प्रगती होते.
४) आळस , नैराश्य , चिड – चिड , वादविवाद हे घरामध्ये कमी प्रमाणात होतात.
५) नोकरीमध्ये , व्यवसायामध्ये चांगले यश मिळते.
६) पैसा व्यवस्थित मिळतो पुरवणीस पडतो आणि कर्ज प्रकरणे वाढत नाही.
७) अध्यात्मिक प्रगती होते त्यामुळे जीवनशैली तणावपुर्व राहत नाही.
८) घरातुन बाहेर पडताना शुभ दिशेतून बाहेर पडल्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात व त्यात चांगले यश मिळते.
९) शुभ प्रवेशद्वार असल्यामुळे नेहमी शुभ वार्ता , शुभ समाचार कानी येतात.
१०) आनंददायी वातावरण व सुख समृद्धीदायक आयुष्याचा आनंद या घरात मिळतो.
( वास्तुनुसार असणाऱ्या घरामध्ये यश हे कायम टिकुन राहते)
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुवि।यक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)